निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा मदतीचा हात – गरजूंसाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श
भामरागड येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीला मदतीचा आधार
भामरागड: सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतेची जाण ठेवत निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमांतर्गत भामरागड येथील श्री. रवी पुगाटी यांना आवश्यक मदत करण्यात आली.
श्री. पुगाटी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांचे निवासस्थान म्हणजे केवळ छप्पर असून, चारही बाजूंना भिंती नाहीत. अशा कठीण परिस्थितीतही ते जिद्दीने आपला जीवनसंघर्ष करत आहेत. त्यांच्या परिस्थितीची दखल घेत निसर्ग अभ्यासक फाउंडेशनने त्यांना कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू देत मदतीचा हात पुढे केला.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास व्हि. निखाडे, मार्गदर्शक डॉ. प्रमोद घोनमोडे आणि प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत ही मदत केली. या मदतीबद्दल श्री. रवी पुगाटी यांनी आपल्या भावना व्यक्त करत फाउंडेशनचे आभार मानले.
सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श:
निसर्ग संवर्धनासोबतच सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारत गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे ही संस्थेची मोठी जबाबदारी आहे. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत असून, इतर संस्थांनाही अशा कार्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 comments:
Post a Comment