राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात ७८ वी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

प्राचार्य चालूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्य, अहिंसा आणि मूल्यशिक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम

अहेरी: येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय येथे ७८ वी महात्मा गांधी पुण्यतिथी अत्यंत शांततामय व शैक्षणिक वातावरणात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. सी. एम. चालूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा अभ्यास, आत्मचिंतन आणि मूल्यशिक्षणावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी सत्य, अहिंसा, साधेपणा आणि सामाजिक जबाबदारी या गांधीजींच्या मूलभूत तत्त्वांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ ऐतिहासिक संदर्भांपुरते मर्यादित न राहता, गांधीविचारांचा आजच्या विज्ञानप्रधान युगात कसा उपयोग होऊ शकतो, यावरही चर्चा केली. या संवादात्मक वातावरणामुळे कार्यक्रम शैक्षणिक दृष्ट्या अधिक अर्थपूर्ण ठरला.

या प्रसंगी प्रा. रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे, डॉ. सुनंदा पाल, प्रा. अतुल खोब्रागडे, डॉ. श्यामल बिस्वास, प्रा. अनिकेत गोंडे, प्रा. कुणाल वनकर, डॉ. अरविंद राठोड, प्रा. कांचन धुर्वे, प्रा. आदेश मंचलवार, प्रा. व्येंकटेश इप्पाला यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनातून महाविद्यालयाची केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक व नैतिक जडणघडणीकडे असलेली बांधिलकी अधोरेखित झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच मानवी मूल्यांची जाणीव निर्माण होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. महाविद्यालयाने सातत्याने राबवलेल्या मूल्याधिष्ठित उपक्रमांची ही परंपरा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment