विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम आयोजित

   

    अहेरी, १२ ऑगस्ट २०२४: राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी  येथे बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल, प्रा. रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे, डॉ. सुनंदा पाल, प्रा. कांचन धुर्वे, आणि प्रा. आदेश मंचलवार होते.

    महाविद्यालयाच्या परंपरेनुसार, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. या वर्षीचे समुपदेशन विशेष महत्त्वाचे होते कारण भारत सरकारने अलीकडेच नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू केले आहे.

    या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे समन्वयन एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्यामल बिस्वास यांनी केले. या प्रसंगी प्रा. वनकर , प्रा. गोंडे, डॉ. राठोड आणि सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

    विद्यार्थ्यांना नव्या धोरणासंदर्भात आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सुस्पष्ट आणि नियोजनबद्ध पद्धतीने होण्यास या कार्यक्रमाची मोठी मदत झाली.






Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment