भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात केमिकल सोसायटीची स्थापना

 


    एटापल्ली, १४ ऑगस्ट २०२४: भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने केमिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विश्वनाथ दरेकर, डॉ. शरदकुमार पाटील, डॉ. संदीप मैंद, डॉ. श्रुती गुब्बावार, आणि डॉ. साईनाथ वडस्कर आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बुटे यांनी केमिकल सोसायटीच्या स्थापनेचे महत्त्व आणि तिच्या कार्याचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी या सोसायटीच्या माध्यमातून रसायनशास्त्र क्षेत्रातील नव्या संधींचा लाभ घेतला पाहिजे, असा संदेश दिला.

    या कार्यक्रमाचे संचालन प्रा. भारत सोनकांबळे यांनी केले. रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजीव डांगे यांनी प्रास्ताविक करताना केमिकल सोसायटीच्या उद्दिष्टांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.

    कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या सोसायटीच्या स्थापनेमुळे महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या अध्ययन आणि संशोधनाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.




Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment