राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त 'गुरुवंदना सोहळा' संपन्न


विद्यार्थ्यांनी घेतला गुरुप्रेमाचा अनोखा अनुभव; निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा प्रेरणादायक उपक्रम

भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे अध्यक्षस्थानी होते, तर उद्घाटन डॉ. संतोष डाखरे यांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रातील प्राध्यापकांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ धार्मिक सण नाही, तर आपल्या आयुष्यातील गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक डॉ. कैलास व्ही. निखाडे यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विनायक मोराडेश्री. प्रशांत आगलावे उपस्थित होते. या वेळी प्रा. प्रमोद घोनमोडे, प्रा. संतोष डाखरे, आणि प्रा. विनायक मोराडे यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

डॉ. निखाडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत गुरुचे शैक्षणिक, सामाजिक व नैतिक योगदान विशद करताना सांगितले की, "गुरु म्हणजे केवळ ज्ञानदाते नसून जीवनदृष्टी देणारे दिव्य व्यक्तिमत्त्व असते."

प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी अध्यक्षीय भाषणात "गुरु विना मार्ग नाही" असा संदेश देत, विद्यार्थ्यांनी गुरूंशी नातं केवळ अभ्यासापुरतं न ठेवता जीवनभर जपावं, असे विचार मांडले.

प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी गुरुचे महान कार्य सांगताना, गुरूंचा अनुभव विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया ठरतो, असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनायक मोराडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत आगलावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल ताजणे, बंडु बोन्डे, विवेक येरगुडे, आणि रमेश गांडगे यांनी विशेष प्रयत्न केले.

"या कार्यक्रमामुळे आम्हाला आमच्या गुरूंच्या योगदानाची जाणीव झाली. अशा कार्यक्रमांनी आमचं मनोबल उंचावलं आहे."
तृतीय वर्ष वाणिज्य विभाग विद्यार्थी 

अशा अर्थपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये गुरुंच्या प्रती आदरभाव वाढतो. निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा आणि परिवर्तनाचा भाग व्हा! 








Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment