राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता मोहीम संपन्न


    अहेरी, १४ ऑगस्ट २०२४: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. "स्वच्छ भारत अभियान" अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल, प्रा. तानाजी मोरे, डॉ. सुनंदा पाल, प्रा. कुणाल वनकर,  डॉ. अरविंद राठोड आणि प्रा. अनिकेत गोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. तसेच प्रा. रमेश हलामी, प्रा. कांचन धुर्वे, आणि प्रा. आदेश मंचलवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानाची स्वच्छता पूर्ण केली.

    या कार्यक्रमाचे समन्वयन एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्यामल बिस्वास यांनी अत्यंत कुशलतेने केले. अहेरी नगर परिषदेच्या सहकार्याने कचरा उचलण्यासाठी कचरा वाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.

    विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतलेली ही मोहीम, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.





Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment