राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

अहेरी, २९ ऑगस्ट २०२४: प्राचार्य डॉ. एम. के. मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय येथील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनंदा पाल यांच्या परिचयात्मक भाषणाने झाली. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्रा. रमेश हलामी यांनी "सराव माणसाला परिपूर्ण बनवतो" या विचारावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात सरावाचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी मोरे यांनी केले तर प्रा. कांचन धुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. कुणाल वनकर, प्रा. अनिकेत गोंडे, डॉ. अरविंद राठोड, प्रा. आदेश मंचलवार आणि श्री. शशिकांत गावंडे यांनी तांत्रिक साहाय्य पुरविले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्फुर्त सहभाग घेतला. मंचावरील कार्यक्रमानंतर "कॅच अँड थ्रो" या खेळाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या गटात युवराज अंबाघरे, मुलींच्या गटात उम्मेअहमद, आणि शिक्षकांच्या गटात प्रा. हलामी यांनी विजेतेपद मिळवले. विजेत्यांना डॉ. पाल यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण झाली असून, सराव आणि मेहनतीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढली आहे.











Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment