राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

विविध खेळांच्या आयोजनाद्वारे छात्रांना शारीरिक आणि मानसिक विकासाची संधी


    भामरागड (प्रा. कैलास निखाडे): राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमराज जी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक विकासाची संधी उपलब्ध करून दिली.

    प्रमुख पाहुणे प्रा. चालुरकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांची विस्तृत माहिती दिली, ज्यातून विद्यार्थ्यांना खेळांच्या प्रति आदरभाव वाढवता आला. प्रा.डॉ. संतोष डाखरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी रुची निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी अथक परिश्रमाने स्वतःला कसे घडवावे यावर विचार मांडले, तर प्रा.डॉ. सुरेश डोहाने यांनी खेळाचा अभ्यासाइतकाच महत्त्व असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

    कार्यक्रमाचे आयोजक प्रा. विशाल सुरेंद्र तावेडे यांनी खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होते यावर प्रकाश टाकला. '३ एच' - (हांड, हार्ट, हार्डवर्क) च्या मदतीने संघर्षाला कसे आत्मसात करावे याबद्दल प्रा. विनायक मोराळे यांनी उपयुक्त सल्ला दिला. प्रा.डॉ कैलास निखाडे यांनी खेळा च्या माध्यमातून विध्यार्थी करीअर करू शकता या बद्दल मागदर्शन केलं. यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव झाली आणि खेळांच्या प्रति त्यांची ओढ अधिक वृद्धिंगत झाली.

    कार्यक्रमाचे संचालन B.A तृतीय वर्षाच्या छात्र ममता भांडेकर आणि स्वप्निल कूरुस्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण कुरुस्वामी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री. बंडू बोन्डे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हजेरीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली, ज्यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.


Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment