विज्ञान महाविद्यालयात फिजिक्स क्लबची स्थापना आणि नॅशनल स्पेस डे उत्साहात साजरा
अहेरी: राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे फिजिक्स विभागाच्या वतीने आणि नव्याने स्थापन झालेल्या फिजिक्स क्लबच्या माध्यमातून नॅशनल स्पेस डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रमेश हलामी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. तानाजी मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक विक्रम साराभाई यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. प्रा. रमेश हलामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाबद्दल माहिती दिली. त्यांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील योगदान आणि भविष्यातील संधी यावरही प्रकाश टाकला.
यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना चंद्रयान ३ बाबत लघु माहितीपट दाखवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड आणि प्रेरणा निर्माण झाली. माहितीपटानंतर ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अतुल खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अनिकेत गोंडे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. सुनंदा पाल, प्रा. कुणाल वनकर, डॉ. अरविंद राठोड, प्रा. कांचन धुर्वे तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाने विद्यार्थी, शिक्षक, आणि कर्मचारी वर्गात वैज्ञानिक विचारसरणीची रुजवण झाली असून, भविष्यातील वैज्ञानिक संशोधनासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
0 comments:
Post a Comment