शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांद्वारे विशेष कार्यक्रम आयोजित
राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे 'सेल्फ गव्हर्नन्स' आणि स्टेज कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एक खास 'सेल्फ गव्हर्नन्स' कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत शिकवण देण्याचे कार्य केले.
प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे, डॉ. सुनंदा पाल, व प्रा. खोब्रागडे सर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना उद्देशून भाषण केले, ज्यामध्ये तनुश्री बिस्वास (B.Sc. III) यांचे भाषण विशेष होते. त्याचप्रमाणे, सूरज पुसली (B.Sc. II) आणि राजेश्वरी बंडीवार (B.Sc. II) यांनी आपल्या ओघवत्या भाषणाने कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
डॉ. सुनंदा पाल यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर भाषण देऊन केली. प्रा. रमेश हलामी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व उलगडले, तर प्राचार्य डॉ. मंडल यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कसे यशस्वी व्हावे याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी 'सेल्फ गव्हर्नन्स' कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यात अशिफा शेख यांनी पहिला क्रमांक मिळवला, उषा दुर्गम यांना दुसरा, तर युवराज अंबाघरे यांना तिसरा क्रमांक मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या दिव्याश्री कविराजवार आणि सानियानाझ शेख यांनी केले. विद्यार्थ्यांनी नंतर शिक्षकांसाठी 'कँडल ब्लोइंग चॅलेंज' आणि 'बॅलून कप स्टॅकिंग' सारख्या मनोरंजक खेळांचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी खास अल्पोपाहाराची सोय केली होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बी.एस्सी. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. प्रा. श्यामल बिस्वास, प्रा. अनिकेत गोंडे, प्रा. कुणाल वनकर, प्रा. कांचन धुर्वे, प्रा. आदेश मंचलवार, प्रा. व्यंकटेश इप्पाला आणि श्री. शशिकांत गावंडे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment