राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात संत तुकाराम महाराज सुभाषितांवर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
भामरागड: राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी विद्यापीठाने पाच महाविद्यालयांची निवड केली होती, ज्यामध्ये भामरागड येथील महाविद्यालयाचा समावेश होता.
स्पर्धेचे उद्घाटन प्रा. कांचन धुर्वे (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सि. एम. चालुरकर होते. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे आणि प्रा. डॉ. सुनंदा पाल (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांचा समावेश होता. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संतोष डाखरे आणि प्रा. अतुल खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी स्पर्धेचे नियम आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. वक्तृत्व कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये १२ विद्यार्थी भामरागड महाविद्यालयाचे, तर २ विद्यार्थी अहेरी येथून सहभागी झाले होते.
स्पर्धेचे विजेते:
- प्रथम क्रमांक: कु. योगिता मुरमुरवार (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी)
- द्वितीय क्रमांक: कु. ममता भांडेकर (राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड)
- तृतीय क्रमांक: श्री. किरण कुरसामी (राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोहिणी पुंगाटी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. ममता भांडेकर यांनी व्यक्त केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी श्री. बंडू बोन्डे, श्री. सुनील ताजणे, तसेच विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment