राजे विश्वेश्वर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे लाहेरी येथे उद्घाटन


ग्रामविकास आणि समाजसेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग

भामरागड: राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराचा शुभारंभ मौजे लाहेरी येथे उत्साहात संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन गावाच्या सरपंच सौ. राजेश्वरी बोगामी आणि पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी श्री. कविश्वर मुकूदवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. सि. एम. चालुरकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. व्हि. निखाडे यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या प्रारंभी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. एम. डोहणे यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामविकास आणि समाजसेवेचे महत्त्व समजावून दिले. शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये स्वच्छता मोहिमा, ग्रामसुधारणा प्रकल्प, आरोग्य शिबिरे आणि पर्यावरण संवर्धन कार्यक्रमांचा समावेश आहे.

ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विनायक मोराळे, प्रा. प्रशांत आगलावे, आणि लोखंडे मॅडम यांनीही या शिबिरात मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचलन डॉ. एस. एस. डाखरे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले, तर आभारप्रदर्शन प्रा. विशाल तावेडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. ताजणे, श्री. बंडू बोन्डे, श्री. विवेक आणि शिबिरातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment