राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालयात ‘पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा’ यशस्वीरित्या संपन्न
भामरागड: महाराष्ट्र शासनाच्या "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे 16 जानेवारी 2025 रोजी "पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा" आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सि. एम. चालुरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एम. डोहणे, डॉ. पी. एस. घोनमोडे, डॉ. एस. एस. डाखरे, डॉ. के. व्हि. निखाडे, आणि प्रा. व्हि. एस. तावडे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सत्यवान महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात प्रा. चालुरकर सरांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी म्हटले, "स्पर्धा कोणतीही असो, नियमित वाचन केल्याशिवाय व्यक्ती स्पर्धात्मक जगात यशस्वी होऊ शकत नाही."
डॉ. डोहणे यांनी वाचनाचा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैचारिक विकासावर होणारा प्रभाव अधोरेखित केला. डॉ. घोनमोडे यांनी सतत वाचनाची सवय कशी आवश्यक आहे हे स्पष्ट केले, तर डॉ. डाखरे यांनी प्रत्यक्ष कथनाद्वारे विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. निखाडे यांनी पुस्तक परीक्षण आणि स्पर्धात्मक सहभागाचे महत्त्व समजावून दिले.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निबंधांचे वाचन केले व आपले विचार सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक मोराळे यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी किरण कुरसामी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बंडू बोन्डे आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे वाचन संस्कृतीशी नवी नाळ जोडली, असे निरीक्षण मान्यवरांनी नोंदवले.
0 comments:
Post a Comment