राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात 'स्कूल कनेक्ट 2.0' कार्यशाळेचा यशस्वी आयोजन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या संकल्पनांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भामरागड: बदलत्या शैक्षणिक गरजांसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणपद्धतीत बदल गरजेचा आहे, असे मत प्रा. विकास चित्ते यांनी व्यक्त केले. राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे 15 जानेवारी रोजी आयोजित 'स्कूल कनेक्ट 2.0' या विशेष कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत मांडण्यात आलेल्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंध कसा आहे, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एच. खंडारकर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये जय पेरसापेन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. शाईनअली सय्यद, कु. एम. बी. गावंडे मॅडम, श्री. विनोद नन्नावरे, प्रा. सि. एम. चालुरकर, प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे आणि प्रा. विनायक मोराळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. प्रफुल नांदे यांनी NEP 2020 च्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणात उपयोग कसा होईल यावर भाष्य केले. कार्यशाळेत भंगवतराव आश्रम शाळा, जय पेरसापेन हायस्कूल, राजे धर्मराव हायस्कूल आणि साई प्रसाद वाणिज्य महाविद्यालयातील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष सं. डाखरे यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभारप्रदर्शन प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. बंडू बोन्डे, श्री. विवेक येरगुडे, श्री. रमेश गाडगे तसेच शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत होणाऱ्या बदलांचे महत्व समजून घेतले. व्याख्यानांदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी विस्तृत उत्तरे दिली, ज्यामुळे चर्चासत्र अत्यंत माहितीपूर्ण ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
0 comments:
Post a Comment