भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा
एटापल्ली, २ ऑगस्ट २०२४: भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथे राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रसायशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजीव डांगे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विनोद पत्तीवार, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डॉ. श्रुती गुब्बावार, प्रा. चिन्ना पुंगाटी आणि प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथींनी विविध वैज्ञानिक विषयांवर सखोल माहिती दिली आणि रसायनशास्त्र क्षेत्रातील आधुनिक प्रगतीची ओळख करून दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. भारत सोनकांबळे यांनी उत्कृष्ट संचालन केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल ढबाले यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून विज्ञानाच्या विविध पैलूंची समज वाढवून घेतली. राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवसाच्या निमित्ताने झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरला.
0 comments:
Post a Comment