विज्ञान महाविद्यालय मधे वेबिनारचे प्रक्षेपण
अहेरी – राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीत दि. २५.०७.२०२४ रोजी शैक्षणिक वेबिनार यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. विविध तज्ज्ञांच्या भाषणांनी आणि संवादात्मक सत्रांनी परिपूर्ण या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:00 वाजता पार्थलाइव्ह या प्लॅटफॉर्मवर झाली.
महाराष्ट्र शासन द्वारा मुलींना मोफत शिक्षण योजने बद्दल ऑनलाईन वेबिनार आयोजन करण्यात आले होते. याद्वारे मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, यांनी विध्यार्थी, पालक, प्राध्यापक व संस्था प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला.
कार्यक्रमाचा समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल यांनी विद्यार्थ्यांसाठी वेबिनारची संपूर्ण माहिती संक्षिप्तपणे मांडली व सदर योजनेचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले.
प्रा. गोंडे, प्रा. वनकर, प्रा. सरमोकादम, प्रा. खंडाले तांत्रिक सहाय्य पुरवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्रा. हलामी, प्रा. मोरे, प्रा. खोब्रागडे, प्रा. बिस्वास, डॉ. पाल, प्रा. राठोड, प्रा. धुर्वे, प्रा. मंचलवार व इतर कर्मचारी वृंद उपस्थिती दर्शिविली.
0 comments:
Post a Comment