राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
स्थानिक -अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, जि. गडचिरोली येथे भौतिकशास्त्र विभाग व मराठी विज्ञान परिषद अहेरी विभाग तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल तथा प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश हलामी विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र तसेच अतिथी म्हणून प्रा. अतुल खोब्रागडे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. शामल बिस्वास रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विशेष उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. सुनंदा पाल ह्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सी. व्ही. रामन व माता सरस्वती यांच्या फोटो पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिकेत गोंडे यांनी केले, लगेच डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनावर प्रकाश चित्रफित दाखवण्यात आले. तसेच वर्ष 2024 चे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे थीम इंडिजीनस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत यावर दुसरे लघुचित्रपित दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम के मंडल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून संशोधनाकडे वळा असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी प्रा. हलामी सर, प्रा. खोब्रागडे सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुणाल वनकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.शामल विश्वास सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ .अरविंद राठोड, प्रा. मोरे, प्रा. कांचन धूर्वे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment